
सोलापूर दि. 9 (जिमाका) :- जिल्ह्यातील दुसरे महायुध्द लाभार्थ्यांनी आपले हयातीचे दाखले व एक पासपोर्ट साईजचे फोटो या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने दि. 31 मे 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर येथे जमा करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले विहित तारखेस जमा होणार नाहीत त्यांचे अनुदान माहे जून 2024 पासून बंद करण्यात येईल व हयातीचे दाखले प्राप्त झाल्यानंतर फरकासह अनुदान देण्यात येईल ,तरी जिल्ह्यातील दुसरे महायुध्दातील लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले हयातीचे दाखले जमा कराव असे अवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोालापर यांनी केले आहे.

