करमाळा प्रतिनिधी

नगरपरिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा नंबर 4 करमाळा या शाळेत आज दिनांक 30 एप्रिल 2024 मंगळवार रोजी न. प. शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे व केंद्र समन्वयक दयानंद चौधरी सर यांच्या प्रेरणेने शाळा पूर्व तयारी

मेळावा क्रमांक एक घेण्यात आला. त्यामध्ये सन 2024 मध्ये इयत्ता पहिलीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मुलांना ढोलच्या तालावर वाजवत गाजवत प्रभात फेरी व मिरवणूक काढण्यात आली. छोट्या बालकांना गुलाब पुष्प देऊन

त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल दगडे व उपाध्यक्षा रेखा बोरा यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या उज्वला माने,

नितीन माने, रसूल शेख, भाग्यश्री वाघमारे उपस्थित होते. मुख्याध्यापिका चंद्रकला सतीश टांगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये सात टेबल मांडून विद्यार्थ्यांचे शारीरिक बौद्धिक क्षमता हसत

खेळत प्रश्न विचारले. विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले. दोरी उडी, रिंग फेकणे, चित्र रंगवणे, सेल्फी पॉईंट मध्ये फोटो काढणे अशाप्रकारे आनंददायी खेळ घेण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटण्यात आले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे शिक्षक संतोष माने सर, बाळू दुधे सर, मुकुंद मुसळे सर, भोसले मॅडम, अंगणवाडी सेविका मांडवे ताई,सु पेकर ताई,  करपे ताई, जगताप ताई यांचे सहकार्य लाभले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *