करमाळा प्रतिनिधी

वेताळपेठ येथील श्रीराम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १७ एप्रिल रोजी रामनवमी दिवशी सकाळी ८ ते १० यावेळेत श्रीरामाचा पवमान अभिषेक मंगेश देशपांडे यांचे अधिपत्याखाली संपन्न झाला. त्यानंतर १० ते १२ वाजेपर्यंत ह.भ.प. अॅड. डॉ. बाबूराव हिरडे यांचे श्रीराम जन्माचे किर्तन झाले. दुपारनंतर भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक हि खोलेश्वर मंदिर ते फुलसौंदर चौक ते जय महाराष्ट्र चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते सुभाष चौक येथे आल्यानंतर संपन्न झाली. दुसऱ्या दिवशी १२ ते ३ या वेळेत श्रीराम मंदिर वेताळ पेठ येथे महाप्रसादाचा भोग भाविक भक्तांनी घेतला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *