पाण्यासाठी महिलांचे नगरपरिषद समोर ठिय्या आंदोलन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील रंभापुरा भागातील महिलांनी पाणी मिळत नाही पाणी मिळावे यासाठी नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.
गेले कित्येक दिवस झाले करमाळा शहरात चार चार पाच पाच दिवसांनी पाणी कमी दाबाने येते आवश्यक तेवढे पिण्यासाठी पाणी मिळत नाही यासाठी महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे वारंवार शहरातील विविध नागरिक महिलांनी पिण्याचे पाण्याची योग्य नियोजन करावे म्हणून निवेदन व संबंधित अधिकाऱ्यांना भेटले परंतु योग्य नियोजन त्यांच्याकडून होत नाही यामुळे महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे.