करमाळा प्रतिनिधी
देशा मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माढा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने करमाळा तालुक्याच्या काँग्रेस आय महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक करमाळा तालुका काँग्रेस आय महिला आघाडीच्या
अध्यक्षा रजनीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शहराध्यक्षा अरुंधती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये काँग्रेस आय महिला आघाडी करमाळा तालुका अध्यक्षा रजनीताई पाटील म्हणाल्या की, आमचे
मार्गदर्शक करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप व काँग्रेस आय कमिटी करमाळा तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रहितासाठी तसेच सर्व धर्मांच्या संरक्षणासाठी
जातीयवादी सत्ता उलथून टाकून देशात पुन्हा एकदा सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीची सत्ता येणे गरजेचे आहे व त्यासाठीच माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या प्रचारासाठी अचूक नियोजन करून जिल्हा
महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शाहीनताई शेख व शितल देवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा तालुक्यातील असणाऱ्या सर्व पंचायत समिती गणांमध्ये व करमाळा शहरात हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक
गावामध्ये पदयात्रा काढून धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांचा जोमाने प्रचार करणार असल्याचे सांगितले. गेल्या दहा वर्षांमध्ये देशामध्ये महागाईने हाहाकार माजवला असून या महागाईचा प्रत्येक महिलेला सामना करावा लागतोय. भाजपाच्या चुकीच्या धोरणाचा फटका हा सर्व सामान्य जनतेला नाहक सहन करावा लागतोय. यामुळेच प्रत्येक पंचायत समिती गण करमाळा शहरातील प्रत्येक प्रभागात मध्ये जाऊन “आपल्या सर्वांची हमी, माढ्यातून एक कमळ कमी” हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे माढा लोकसभा उमेदवार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचे रजनीताई पाटील यांनी सांगितले. सदरच्या बैठकी करीता करमाळा ग्रामीण व शहरातील सर्व महीला पदाधिकाऱी मोठ्या संख्येत उपस्थितीत होत्या.