करमाळा प्रतिनिधी

गौंडरे येथे ग्रामस्थांच्या व वसुंधरा परिवार यांच्या सहकार्याने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीरामजन्म ते हनुमान जयंती दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आध्यात्मा बरोबरच सामाजिक उपक्रमाने साजरा होणाऱ्या या सप्ताहाकडे तालुक्यातील एक आदर्श सप्ताह म्हणून पाहिले जाते. आज आध्यात्माबरोबर समाजहिताच्या उपक्रमांची गरज आहे. अंधश्रद्धा, वृक्षारोपण त्याचबरोबर तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढले पाहिजे या साठी प्रतिवर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या अखंड सप्ताहाचे हे पहिले तपपूर्ती वर्ष आहे. या अनुषंगाने या वर्षी भरगच्च व समाजहिताच्या कार्यक्रमाची पर्वणी असणार आहे.

या वर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे जगप्रसिद्ध व्याख्याते डॉ.स्वागत तोडकर यांचे आरोग्य विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सध्या जगभरातील असंख्य रुग्णांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होतो आहे. ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या अमृत वाणीचा व आरोग्याविषयी मार्गदर्शनाचा लाभ व्हावा यासाठी डॉ.स्वागत तोडकर यांनी आपला अनमोल वेळ दिला आहे. त्यामुळे या व्याख्यानाचा परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वसुंधरा परिवाराकडून करण्यात आले आहे.

वसुंधरा परिवार महा. राज्य, अखंड हरिनाम सप्ताह कमिटी, कृषी सप्ताह व आरोग्य सप्ताह आयोजित तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रा.ली चे संस्थापक, राष्ट्रीय पारितोषिक विजेते, सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ व व्याख्याते स्वागतजी तोडकर यांचे औषधा विना आरोग्य हसत खेळत घरगुती उपचारांवर अनमोल व मोफत मार्गदर्शन.

दिनांक: रविवार दि. 21 एप्रिल 2024 रोजी. सायं. 6:00 ते 7:00 वा

स्थळ: गौंडरे ता. करमाळा जि. सोलापूर

घरगुती उपचार व ॲपोइंटमेंटसाठी संपर्क

Landline No:

0231-2688800

+91 7066021312

+91 9921577033

Email: contact@todkarsanjeevani.com

Website: www.todkarsanjeevani.com

CENTERS: Kolhapur, Pune, Navi Mumbai Vashi.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *