करमाळा प्रतिनिधी
2023 मध्ये अत्यल्प प्रमाणात करमाळा तालुक्यात पाऊस पडल्यामुळे 2024 च्या उन्हाळ्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक स्वरूपामध्ये जाणवत आहे. विविध गावांना पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागातील गावांना भीषण
पाणीटंचाईच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. विविध गावातून टँकरची मागणी होऊ लागली आहे, टँकर मंजुर होत आहेत, परंतु टँकर भरण्यासाठी आवश्यक असलेले जलस्त्रोत आटल्यामुळे जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू व्हावी या संदर्भात
आपण जिल्हाधिकारी सो यांना पत्र व्यवहार केला व या योजनेच्या दुरुस्तीसाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मंजुर निधीमधून योजनेची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली. 29 गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा
योजनेचे विज बिल थकल्यामुळे योजना सुरू होणे अडचणीचे होते. या संदर्भातही आपण मार्ग काढून जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे. त्याची ट्रायल यशस्वी झाली. 20 एप्रिल पर्यंत पाणी वरकटणे चौफुला येथील टाकीत
दाखल होईल. त्या ठिकाणाहून दुष्काळी पट्ट्यातील टँकर भरण्यासाठी तो फिडर पॉईंट म्हणून आपल्याला वापरता येईल. जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमुळे टँकरच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे