करमाळा प्रतिनिधी
जेऊर येथील मंगळवार हनुमान चालीसा ग्रुप च्या वतीने “महादेव – मारुती मंदिर” इंदिरानगर येथे रामनवमी अतिशय भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
प्रथमतः श्रीराम जय राम जय जय राम हा जप करण्यात आला. बरोबर 12 वाजता रामजन्म झाल्यानंतर पुष्पवृष्टी करून आरती करण्यात आली. यावेळी मंडळाच्या कार्यकर्ते यांनी भाविकांसाठी महाप्रसाद ची व्यवस्था करण्यात आली होती.
महाप्रसाद पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी लव्हे येथील भजन मंडळींचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी ग्रुप सदस्यांनी व भाविकांनी या भजनाचा लाभ घेतला. यावेळी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. हा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी
मंगळवार हनुमान चालीसा ग्रुप चे सदस्य व मार्गदर्शिका विजया ताई कर्णवर, पवन कोठारी, दादासाहेब सूर्यवंशी, वैभव शिरस्कर, ऋषभ मंडलेचा, दादासाहेब दुधे, गणेश भाऊ पवार, करण निमगिरे, बाबू जाधव, माधव सूर्यवंशी, परेश खीलोसिया, प्रतिक खिलोसिया व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.