
करमाळा प्रतिनिधी
11 एप्रिल या दिवशी सकाळी 8:00 वाजता स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याच ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन करमाळा शहरातील शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ (आण्णा)

कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले स्मारकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये

मुला/मुलींचे लेझीम पथक होते. तसेच रथ व दोस्ती बँड डी.जे हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. सदर मिरवणुकीत पुरुष, महिला व अनेक मान्यवर यांचा लक्षणीय सहभाग होता. दुपारी 2:00 पर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात आले. करमाळा

तालुक्यातील तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्यासह करमाळा शहरातील अनेक व बहुसंख्य मान्यवरांनी फुलेंच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी उपस्थिती दर्शवली. करमाळा तालुक्याच्या बाहेरील मान्यवरांनी सुद्धा अभिवादन करण्यासाठी

उपस्थिती दाखवली. स्मारकाची सजावट आकर्षक फुलांनी केली होती. मंडप व आकर्षक रोषणाई होती. तसेच स्मारकाच्या समोर भव्य दिव्य रांगोळी काढली होती. दुपारी 4:00 वाजता जयंतीच्या निमित्ताने परांडा तालुक्यातील व्याख्याते शरद नवले

सर यांचे व्याख्यान यश कल्याणी सेवाभवनात आयोजित केले होते. वैचारिक पुरुष व महिलांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. जयंतीचा कार्यक्रम क्रांतीसुर्य प्रतिष्ठान करमाळा शहर व तालुका यांच्या सौजन्याने घेण्यात आला. सरांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम राऊत यांनी केले व आभार प्रदर्शन अमोल नाळे यांनी केले.
