जेऊर प्रतिनिधी
जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची १९७ वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना सोमनाथ जाधव म्हणाले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई हे फार मोठे समाज
क्रांतिकारक होते. महात्मा फुले यांचे सामान्य माणसावर प्रेम होते. आपले सारे जीवन या महापुरुषाने वंचितांसाठी वाहिले या देशातील दिन दुबळ्यांसाठी आपले अवघे जीवन देणाऱ्या ज्योतिराव फुले या महापुरुषाला महात्मा या पदवीने गौरवण्यात येत
आहे व अज्ञानाच्या अंध कारातून ज्ञानाचा तेजस्वी प्रकाश दाखवा गरीब अस्पृश्य शोषित पीडित दिन दुबळ्या बहुजन समाजातील जनतेमध्ये क्रांतीची ज्वाला पेटवून अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणा देऊन त्यांच्या मनात जागृत
करणारा होता. समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणारे, भेदाभेद, अस्पृश्यता, सती, बालविवाह सारख्या कर्मठ रूढी परंपरा व अंधश्रद्धांना विरोध करत कायम एकात्मतेचा, मानवतेचा विचार रुजवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन
चरित्रावर विचार मांडले. यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, निलेश पाटिल, अतुल निर्मळ,बाळासाहेब तोरमल, सागर बनकर, हेमंत शिंदे, सोमनाथ जाधव, आदिनाथ माने, किशोर कदम, सचिन गारुडे, अजित उपाध्ये, धन्यकुमार गारुडी, संतोष पंडित, अविनाश घाडगे, गणेश मोरे, इत्यादी उपस्थित होते.