
करमाळा प्रतिनिधी
ग्रामपंचायत पोंधवडी येथे काल दिनांक 11 /4 /2024 रोजी महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व ग्रामस्थांनी झालेल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय नियोजनबद्ध करण्यात आले

होते. सकाळी नऊ वाजता मूर्ती स्थापना करण्यात आली होती. संध्याकाळी पाच ते सात प्राध्यापक प्रदीप मोहिते यांचे व्याख्यान महात्मा फुले यांचे कार्य या विषयावर झाले. त्यानंतर सात ते दहा पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये समस्त ग्रामस्थ लहान मोठ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता व 10 नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

कार्यक्रमाचे नियोजन अमोल भोजने, किसन अनारसे, विनोद क्षीरसागर, रेवन राऊत, अमोल गाडे, वसंत भिसे, निकेश क्षीरसागर, नाना क्षीरसागर, अशोक राऊत, भागवत राऊत, संतोष इदवते, सोनू क्षीरसागर यांनी उत्तम प्रकारे केले.



