मोलमजूरी करुन आईने बनवले मुलाला आधिकारी …
पुनवर ( ता- करमाळा )येथील श्रीमती रुक्मिणी गजानन धनवडे या मातेने मोलमजूरी करुन आपल्या मुलाला (राहुलला )अधिकारी बनवले . राहुलचा हा प्रवास अतिशय खडतर, हृदयस्पर्शीअसा आहे.राहुल ७ महिन्याचा असतानाच त्याचे पिताछत्र हरपले.राहुलला एक भाऊ व दोन बहिणी या सर्वांची संभाळण्याची जबाबदारी आईवर पडली.आईने अशा अवस्थेत न डगमगता येणाऱ्या संकटाला सामोरे जात मोल-मजूरी करुन आपल्या मुलांचे संगोपन करून त्यांना शिक्षण दिले. हेच आईचे

कष्ट,उमेद,अठरा विश्व-दारिद्र्य पाहून राहुलने मनाशी खूनगाठ बांधून आपले शिक्षण कमवा व शिका योजनेतून घेतले.शिक्षण घेताना त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. एम.पी.एस.सी. परिक्षेसाठी आईने मोलमजूरी व भावाने ड्रायव्हर काम करून ,वाटेल ते कष्ट करून खर्च पुरवला. राहुलने सात वर्षे एम .पी.एस.सी.चा अभ्यास करत वेगवेगळ्या परीक्षेचे निकाल एक-दोन मार्कावरून जात असे तरी आपले मन खचून न जाता आई आणि भावाच्या प्रेरणेमुळे आपल्या अठरा विश्व दारिद्र्याकडे पाहून अभ्यासाची चिकाटी न सोडता शेवटी नगरपरिषद संवर्ग राज्यसेवा अंतर्गत टी .सी.एस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात 39 व्या क्रमांकाने कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाली .


राहुलच्या या कष्टातून मिळवलेल्या यशामुळे पुनवर ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला . याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक लक्ष्मण राख,प्रा.कुदळे, राहुलचे बंधू दादा धनवडे, सोमनाथ धनवडे, चुलते आजिनाथ धनवडे,मा .सरपंच आनंद( मामा )भांडवलकर, ग्रामपंचायत सदस्य बापू (चेअरमन )नरसाळे, माजी मार्केट कमिटी संचालक अरुण (बापू) धुमाळ,शालेय समितीचे अध्यक्ष सोमनाथ थोरवे,सरपंच केशव शेळके,उपसरपंच सुनील जाधव, माजी उपसरपंच अतुल थोरवे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ नरसाळे,बाळू नरसाळे,डॉ .येताळ, सुप्रसिद्ध युवा उद्योजक युवराज ( शेठ)साबळे, भारत नरसाळे, बापूराव नरसाळे, मा .सरपंच रामभाऊ नरसाळे,मा.उपसरपंच अशोक नरसाळे, भारत ननवरे, दादा येताळ, दादा धनवडे, नितिन येताळ,लक्ष्मण निंबाळकर,पोपट जाधव,रवींद्र जाधव,गणेश जाधव,अविनाश शेलार तसेच गावातील लहान थोर मंडळी

विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सत्काराला उत्तर देताना राहुलने जिद्द,चिकाटी,डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय गाठू शकतो हे व्यक्त केले .आपल्या यशाचे सर्व श्रेय आई व भावाला देऊन त्यांचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही असे उद्गार काढले.याप्रसंगी प्रा . लक्ष्मण राख,अविनाश शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री . सोमनाथ थोरवे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.दिलीप थोरवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सोमनाथ धनवडे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *