जेऊर करमाळा

कार्यकर्त्यांनी जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी वेळ द्यावा अशी सुचना प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी दिली. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नारायण (आबा) पाटील गटातील प्रमुख

पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. यावेळी अठरा गावातील पाटील गटाचे आजी माजी पदाधिकारी आणि लोकनेते नारायण (आबा) पाटील मित्रमंडळाच्या प्रमूख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. या बैठकीत अनेकांनी आपली मते मांडली. यावेळी

बोलताना प्राचार्य बिले म्हणाले की, माजी आमदार नारायण (आबा) पाटील हे लोकसभा निवडणुक लढवतील की नाही हे वरील पातळीवर चाललेल्या घडामोडींवर अवलंबून आहे. परंतु आता कार्यकर्त्यांनी सक्रिय राहुन जनमताचा अंदाज घेतला पाहिजे.

जनतेचा कौल जाणून घेतला पाहिजे. लोकसभा निवडणुकीबाबत जनतेची मते जाणून घेण्यासाठी जनसंवाद महत्वाचा असुन आता लोकांमध्ये मिसळून मते जाणून घ्या. पुढील राजकीय घडामोडी काहीही होऊद्या, परंतु आपल्याला आता तयारीला

लागले पाहिजे असे मत प्राचार्य बिले यांनी मांडले. यावेळी आवाटी, नेरले, वरकुटे, अळसुंदे, सालसे, गौडरे, निमगाव, कोळगाव, हिवरे, हिसरे, फिसरे, जेऊर, कोंढेज, कुंभेज,पोपळज, भाळवणी, निंभोरे,पांगरे, शेलगाव (वां.) या गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक बाबासाहेब कोपनर यांनी केले तर आभार सोशल मीडिया तालूका प्रमुख संजय फरतडे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *