करमाळा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शासनाचे कोणतेही आदेश नसताना पीककर्ज वाटपामध्ये मनमानी आणि हुकूमशाही कारभार सुरू आहे. सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये

प्रशासकांची नियुक्ती असून प्रशासक सध्या चालू परिस्थितीचा विचार न करता मनमानी कारभार करत आहेत. केंद्र शासन व राज्य शासनाच्या व्याज मुक्त पीक कर्ज धोरणानुसार करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना करोडो रुपये बिगर व्याजी मिळत

असताना पीक कर्ज न वाटण्याच्या आडमुठ्या धोरणामुळे सध्या या योजनांपासून  विविध विकास कार्यकारी सोसायटीचे हजारो सभासद, शेतकरी वंचित राहत आहेत. याबद्दल शासनाने त्वरीत लक्ष घालावे अशी मागणी संस्थेचे चेअरमन डॉ. विजय रोकडे, व्हाइस चेअरमन भैरवनाथ बंडगर आणि सर्व संचालक मंडळ यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *