जेऊर प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने जेऊर येथे शिवजयंती मिरवणूक सोहळा पारंपारिक पद्धतीने व धुमधडाक्यात उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. प्रथम मूर्ती पुष्पहार माता भगिनी व वारकरी संप्रदाय

ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज छत्रपती शिवराय व इतर महापुरुषांची 1000 पुस्तके जयंती साठी उपस्थित असणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी तसेच आलेल्या पाहुण्यांना व माता-भगिनीस वाटप करण्यात आले. माता भगिनींची संख्या लक्षणीय होती व यावेळी लहान मुला मुलींनी राष्ट्रमाता जिजाऊ व

छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले व माता रमाई यांची वेशभूषा परिधान करून या रणरागिनी 25 घोड्यावरती स्वार झाल्या. महाराष्ट्राची परंपरा असणारी संतांची भूमी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणूक सोहळ्यामध्ये टाळ विना मृदंग याचा मोठ्या जोशामध्ये आवाज करून व अभंग गाऊन वारकरी दिंडी परंपरा जेऊर येथील व

शेटफळ येथील वारकरी संप्रदाय बहुसंख्येने उपस्थित राहून पार पाडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसाठी रथाची खूप आकर्षक अशी सजावट केली होती व रथामध्ये विविध कलरची लाईटची रोशनी होती व रथाच्या समोरील बाजूस मावळ्यांची वेशभूषा करून मावळा ग्रुप होता व शिवराज्याभिषेक सोहळ्यात सन्मान शेटफळ (ना) येथील लेझीम पथक मिरवणुकीचे

आकर्षक ठरले. योद्धा करिअर अकॅडमी झरे येथील मुलांनी व मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती लेझीम खेळून मिरवणुकीचे आकर्षण केले. तसेच कोंढेज येथील ग्रामस्थांनी गजे ढोल वाद्यावर जुन्या पारंपारिक पद्धतीने लेझीम सादर केला.

मिरवणूक आकर्षण – शिवराज्याभिषेक सोहळ्यात सन्मान झालेले शेटफळ (ना) येथील लेझीम पथक व सर्व ग्रामस्थ, शंभो वाद्य व ढोल पथक पुणे ६० मुला-मुलींचे, योध्दा करिअर अकॅडमी झरे ६० मुला-मुलींचे लेझीम पथक, भैरवनाथ लेझीम पथक कोंढेज, जेऊर व परिसरातील सर्व वारकरी सांप्रदाय यांचा सहभाग, श्री संत हरी हरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कोर्टी ५० मुले यांची पायी वारी, शिवनेरी मर्दानी खेळ व झांज पथक ५० मुला-मुलींचे करकंब, श्रीराम हलगी ग्रुप व गोफ लेझीम पथक  विझोरी ४० मुलांचे, शिव छत्रपती रथ एन्ट्री व मावळा ग्रुप अकलुज, बाभुळगांव येथील हालगी पथक, अंजनडोह येथील गजे ढोल व ताशा पथक, जेऊर परिसरातील सर्व अश्वांचा सहभाग, जेऊर येथील हलगी पथक.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीच्या कार्यक्रमांमध्ये कलाकारांनी आपली उत्कृष्ट अशी कला सादर केली. जेऊर मध्ये सर्व चौकामध्ये लाईटचे व्यवस्था संभाजी ब्रिगेड ग्रुपच्या वतीने करण्यात आली होती. जेऊर मधील सर्व माता भगिनी व जेऊर येथील मुस्लिम समाज यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीतील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व सर्व जाती धर्मातील समाज बांधव व माता-भगिनी मोठ्या संख्येने व कुटुंबासहित व करमाळा  तालुक्यातील अधिकारी व पदाधिकारी तसेच शिवप्रेमी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच सोळंकी परिवाराच्यावतीने थंड पेयाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने सर्व शिवप्रेमींना जेवणाची ही व्यवस्था केलेली होती. व कार्यक्रम पार पाडण्यासाठी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *