शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
करमाळा प्रतिनिधी
रिटेवाडी उपसा सिंचन संदर्भात करमाळा तालुक्यातील 40 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन रेटेवाडी उपसा सिंचन योजने संदर्भात चर्चा केली.
थेट जलसंपदा सचिव दीपक कपूर यांना मोबाईल वरून फोन लावून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या शिष्टमंडळाची चर्चा व योजनेची स्टेटस सांगा असे सूचना दिल्या.
तात्काळ शिष्टमंडळाने जलसंपदा सचिव दीपक कपूर यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दीपक कपूर यांनी जवळपास 30 मिनिटे या योजनेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.
त्यांनी संपदा खात्यातर्फे यापूर्वीच या योजनेचे सर्वेक्षण करण्याचे काम केंद्र सरकारच्या एका संस्थेला दिले असून मार्च महिन्यानंतर या योजनेचे अंदाजपत्रक तयार करून याला मंजुरी देण्यासाठी कॅबिनेट पुढे ठेवून असे आश्वासन दिले.
सरपंच शहाजी माने, सुभाष गाडे, अशोक ढेरे, भजन दास खैरे, सुभाष बलदोटा अरुण शेळके, मनोहर पडलिंगे, मोहन मार्कंड, उमेश बर्डे, प्रशांत पाटील, प्रवीण बिनवडे, मदन पाटील, हनुमंत खटमोडे, सोनाली गायकवाड, प्रीतम सुरवसे, बापू पवार, आजिनाथ इरकर, फुंदे किरण, आदि सरपंच उपस्थित होते.
उद्या पुणे येथील चीफ एक्झिटिव्ह इंजिनियर जलसंपदा खाते धुमाळ कार्यालयात हे शिष्टमंडळ भेटणार आहे.
………..
जलसंपदा सचिव दीपक कपूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांच्या दालनात बैठक घेऊन मार्च महिन्यानंतर या योजनेचा अहवाल येईल व नंतर अंदाजपत्रक सादर करून मुख्यमंत्री यांच्याकडे कॅबिनेट कडे मंजुरीसाठी पाठवू अशी आश्वासन दिले आहे. अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिले आहे.