
करमाळा प्रतिनिधी
केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी ‘ परीक्षा पे चर्चा -२०२४ ‘ हा कार्यक्रम दि २९ जानेवारी रोजी आयोजित केला होता. हा कार्यक्रम भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. देशभरातून वेगवेगळ्या भागामधून आलेल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी

संवाद साधला. सदर कार्यक्रम करमाळा शहर व तालुक्यातील नामांकित मातृशाळा असलेल्या करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रोजेक्टर वरून लाईव्ह दाखविण्यात आला. या उपक्रमामूळे विद्यार्थ्यांना ‘व्हर्चुअल क्लासरूम ‘ तथा आभासी वर्गअध्ययनाचा एक वेगळा अनुभव मिळाला. या

संवादामध्ये पंतप्रधान महोदयांनी देशाच्या विविध भागातून प्रकल्प घेवून आलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या, कल्पना त्यांचे प्रश्न समजून घेवून त्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सतत परिक्षेचा सराव केल्याने परीक्षेपूर्वी तणाव येणार नाही.

असा मौलिक सल्ला पंतप्रधानांनी दिला. शिक्षक व पालकांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेचे प्रभारी प्राचार्य अनिस बागवान सर, जेष्ठ पर्यवेक्षक बाळकृष्ण पाटील सर, पर्यवेक्षिका सुनिता नवले मॅडम, विज्ञान शाखा विभाग प्रमुख विजय पवार

सर तसेच सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सह विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते .
