करमाळा प्रतिनिधी

यंदा पाऊस कमी पडल्याने उजनी धरण केवळ 60.66 % एवढेच भरले असताना उजनी च्या पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही. गरज नसताना वारेमाप पाणी खाली सोडण्यात आले. परिणामी उजनी जानेवारीतच मायनस मधे गेले. आता पुढचे सहा महिने कसे जाणार या भितीने उजनी जलाशय काठावरील नागरिक भयभीत झाले आहेत. नोव्हेंबर डिसेंबर पासून पाण्याचे योग्य नियोजन करा असा आर्त टाहो फोडणाऱ्या धरणग्रस्तांकडे कुणी ही लक्ष दिले नाही. उलट खाली पाणी सोडण्याची जणू स्पर्धाच लागली.

यामुळेच संतापलेल्या धरणग्रस्तांनी आता तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील आठवडय़ात धरणग्रस्तांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट वस्तुस्थिती कथन केली. पण परिणाम शून्यच.गरज नसताना कॅनालचे पाणी खाली सोडणे सुरूच आहे. धरणाखालील नागरिकांनी पाणी सोडू नका म्हणून आंदोलन देखील केले. तरी पाणी कुणासाठी आणि का सोडले जातेय ते कळत नाही.

म्हणून आता धरणग्रस्त रस्त्यावर उतरले आहेत. याचाच एक भाग म्हणून येत्या गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी भिगवण ता. इंदापूर येथे सागर हाॅटेल समोर सकाळी 11  वाजता राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात येणार आहे.

हा रास्ता रोको करमाळा ,इंदापूर, कर्जत व दौंड तालुक्यातील धरणग्रस्त नागरिक एकत्रीत करणार आहेत.

हा रास्ता रोको यशस्वी करण्याच्या पार्श्वभूमीवर जलाशय काठावरील नागरिक गावोगावी बैठका घेऊन भिगवणला जाण्याचे नियोजन करीत आहेत.

आज वांगी नं 1 येथे सायंकाळी पाच वाजता नियोजन बैठक पार पडली.

या बैठकीत वांगी परिसरातील ढोकरी, भिवरवाडी ,बिटरगाव, वांगी नं1,3,4, नरसोबावाडी,पांगरे,आदी गावातून पन्नास ते साठ चार चाकी वाहनातून शेकडो लोक जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला.

या बैठकीस उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर, उपाध्यक्ष भारत साळुंके ,भा. ज. पा. चे नूतन जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, मकाईचे संचालक सचिन पिसाळ, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके ,वांगी ग्रामपंचायतीचे सदस्य

दत्ताबापू देशमुख, तानाजी देशमुख,सोसायटीचे संचालक विकास पाटील, सुधीर देशमुख, रावसाहेब देशमुख, देवा तळेकर, नवा शिनगारे,पैलवान शिवाजी खरात,भारत सलगर,गणेश खरात,विष्णुपंत वाघमारे,बाळू महानवर, दादा भोसले ,आबा सरडे, वैभव पाटील, गणेश पाटील, भारत रोकडे,चंद्रकांत राम अण्णा देशमुख, आदि बहुसंख्येने उपस्थित होते.

उध्या कंदर पंचक्रोशीतील नागरिकांची सकाळी 9 वाजता बैठक आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *