करमाळा प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात तालुक्यातील मोठा नेता प्रवेश करणार तो असणार महाविकास आघाडीचा उमेदवार महाराष्ट्रात राजकीय उलटा पालथ झाल्यावर करमाळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस

पार्टी पुरस्कृत अपक्ष आमदार संजय मामा शिंदे हे अजित दादा गटासोबत गेल्यामुळे 2019 ला ज्या पद्धतीने बागल गटाने राष्ट्रवादी सोडल्यावर परिस्थिती निर्माण झाली होती. तीच परिस्थिती आज करमाळा तालुक्यात निर्माण झाली आहे.

तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी मोजक्या कार्यकर्त्या सोबत पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता व तालुकाध्यक्ष मांढरे पाटील यांनी पक्ष आदेश पाळून अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा जाहीर करून निवडून

आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यावेळी बागल गटाचा पक्ष सोडण्याचा अंदाज चुकीचा ठरला होता. किंबहुना त्यामुळे त्यांचे राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणीपत झाले. वास्तविक पाहता शरदचंद्रजी पवार यांना मानणारा तालुक्यात खूप

मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांना झाला होता. आज पुन्हा जी चूक बागल गटांनी केली तीच चूक आमदार संजय मामा यांनी केली आहे का हा येणारा काळच ठरवेल, परंतु येत्या काळात तालुक्यातील एक मोठा नेता

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शरदचंद्र पवार यांच्या संपर्कात असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील व शहराध्यक्ष शिवराज जगताप यांनी सांगितले आहे. तालुक्यातील महाविकास आघाडीच्या मताचा फायदा येत्या काळात या नेत्याला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या शिबिरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या दोघांच्या वरती ही जबाबदारी दिलेली असून लवकरच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील करमाळा तालुक्यात दौऱ्यावर येणार असून त्याचे नियोजन तालुकाध्यक्ष मांढरे पाटील व शहराध्यक्ष शिवराज जगताप यांच्याकडे सोपवले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *