महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अक्षय काळे यांची हॅट्रिक
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत अक्षय काळे याने हॅट्रिक मारली असून, नुकतेच ते राजपत्रित क्लास- १ अधिकारी (गॅजेटेड ऑफिसर) ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यापूर्वी अक्षय काळे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे

घेण्यात आलेल्या दोन परीक्षा पास झालेले आहेत. त्यामध्ये त्यांची राज्य करनिरीक्षक पदी निवड झाली तसेच सहाय्यक कक्ष प्रमुख मंत्रालय यात ते राज्यात प्रथम आलेले आहेत. अक्षय काळे हे करमाळा शिवसेना उपशहरप्रमुख राजाभाऊ काळे यांचे ते

पुतणे आहेत. अक्षय काळे ( ह.रा.सूर्डी, ता.बार्शी) यांच्या यशामुळे सुर्डी येथे व करमाळ्यात जल्लोष साजरा करण्यात आला. मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचावर्षाव होत आहे. अक्षय काळे यांचे वडील ईश्वर काळे हे महावितरण मध्ये

प्रिन्सिपल ऑपरेटर पदावर माढा येथे कार्यरत आहेत. अक्षय याचे पहिली ते दहावीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय करमाळा व दिलीपराव सोपल विद्यालय बार्शी, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट ॲन्ड सायन्स सोलापूर येथे झाले आहे. त्यांनी

मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी घेतली आहे. परीक्षेचा अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांचे आजोबा कै.मच्छिंद्र काळे यांच्याकडून घेतली. त्यांचे आजोबा ग्रामसेवक ते विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. अक्षय यांचे लहान बंधू अजय काळे आयआयटी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर कार्यरत आहे. राजपत्रित क्लास – १ अधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल करमाळा शिवसेना उपशहरप्रमुख राजाभाऊ काळे यांनी करमाळा येथे त्यांचे समर्थक व कार्यकर्ते यांच्यासह परिवारा तर्फे पेढे वाटून आनंद साजरा केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *