करमाळा शहरात वाढतेय अतिक्रमण अधिकारी डोळे झाक करीत आहे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील चारही बाजूला अतिक्रमणाने वेडा घातला आहे. याकडे करमाळा नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम

डोळेझाक करीत आहे अशी माहिती जगताप गटाचे नेते बाळासाहेब जगताप यांनी दिली आहे. यावेळी समता परिषदेचे ज्येष्ठ नेते दिलीप भुजबळ उपस्थित होते.
करमाळा शहरातील कमलादेवी रोडवर अतिक्रमणाने विळखा घातला आहे. याकडे नगरपरिषद व बांधकाम विभाग अजिबात लक्ष देत नाही अतिक्रमणामुळे त्या भागात वारंवार अपघात होत आहे. कित्येक नागरिक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आहे. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग आहे. त्याचप्रमाणे करमाळा बस स्टॅन्ड, मौलालीचा माळ रोडवर ही खूप मोठे

अतिक्रमण झाले तिथेही पाल टाकल्यासारखे टाकले आहे. त्याच प्रमाणे पोथरे नाका परिसरात ही अतिक्रमण झाले आहे.
नगरपरिषद व बांधकाम विभागांनी यांना सर्वांना खरेदी करून दिल्यासारखी जागा दिली आहे. याकडे दोन्ही अधिकारी कर्मचारी डोळे झाक करत आहे. याबाबत लवकरच मोठे आंदोलन घेणार असल्याचे जगताप गटाचे नेते बाळासाहेब जगताप यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *