श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
करमाळा प्रतिनिधी
श्रीराम मंदिर ट्रस्ट वेताळ पेठ करमाळा मंदिराचा जिर्णोद्धार व श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई, हनुमान यांच्या

मूर्तीची स्वाध्याय मिरवणूक शोभायात्रा श्री खोलेश्वर मंदिर, किल्लावेस येथून प्रमुख मार्गावर निघणार आहे व समाप्ती श्री राम मंदिर वेताळपेठ येथे होणार आहे.


सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी सात वाजता प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम वेळ दुपारी 12 वा. 29 मि. 8 से. ते दुपारी 12 वा. 30 मि. 32 से. या 84 सेकंद मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या वेळेत होणार आहे.


श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा पोरोहित्य करण्याचे कार्य वेदशास्त्र संपन्न (वेदमूर्ती) संजूदेवा मुळे शेवगाव, जि. अहमदनगर यांचे बरोबर सात सप्त ब्रह्मवृंद यांच्या सेवेत होणार आहे. महाप्रसाद दुपारी 1 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आहे. श्रीराम मंदिर ट्रस्ट विद्यापीठ, करमाळा यांनी सर्व भक्तांनी उपस्थित रहावे असे आयोजकांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *