
करमाळा प्रतिनिधी
26 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 या दरम्यान संपन्न झालेल्या शालेय भोपाळ (म. प्रदेश) राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेमध्ये चिखलठाण या गावातील निकिता अमोल रोकडे व श्रेयश अमोल रोकडे या दोघा बहिण भावांनी राष्ट्रीय स्पर्धेत आपला दबदबा

कायम करत सुवर्णपदक मिळवले. त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेवासा या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत आहेत. त्याबद्दल चिखलठाण मध्ये जि. प. मा. उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी जंगी सत्काराचे आयोजन केले होते. या प्रसंगी उपस्थित मा.

संचालक संदिपान बारकुंड, सरपंच धनश्री विकास गलांडे, उपसरपंच आबासाहेब मारकड, मुख्याध्यापक वायदंडे सर, गोटू पवार, ग्रा.पं. सदस्य आनंद पोळ, ग्रा.पं. सदस्य चव्हाण, राजेंद्र चव्हाण, चंद्रकांत सुरवसे, साहेबराव मारकड, मारुती गायकवाड,

पोलीस पाटील दिलीप दुबळे, बाळासाहेब गव्हाणे, सर्जेराव मारकड, सतीश बनसोडे, पप्पू गव्हाणे, संतोष सरडे, अमोल रोकडे, रंगनाथ रोकडे, सुदाम चव्हाण, किसन पवार, विवेक जानकरे, सतीश तरंगे तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी जि.प. मा. उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी रोकडे बहिण भावांना आमदार संजय मामा शिंदे यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले व आशीर्वाद दिला व आॅलिंपिक स्पर्धेपर्यंत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या व तसेच हलगी वाजून स्वागत केले.


