करमाळा प्रतिनिधी

शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची असे सभापती विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केल्यानंतर करमाळ्यात शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे नेतृत्वाखाली श्रीराम चौक चौक येथे जल्लोष केला.

यावेळी करमाळा विधानसभा प्रमुख राहुल कानगुडे शिवसेना शहरप्रमुख नागेश काळे, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे दीपक पाटणे, शिवकुमार चिवटे, शाखाप्रमुख सचिन कानगुडे, विशाल ढेरे, लखन आवटे, संकेत कानगुडे, महेश कानगुडे, विजय

गायकवाड, भाजपचे प्रियाल अग्रवाल, रितेश कटारिया, तेजस शिंदे, अक्षय कानगुडे. कुंभारवाडा शाखाप्रमुख राजू परदेशी, प्रसिद्धी प्रमुख सागर गायकवाड, वाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, निलेश चव्हाण, नागेश शेंडगे, केशव साळुंखे, संजय

जगताप, सरपंच बापूराव पवार, आदी शिवसैनिक उपस्थित होते. श्रीराम चौकात जल्लोष करून पेढे वाटप करण्यात आले व फटाकड्या उडवण्यात आले करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली. शिवसेना आपली खाजगी मालमत्ता आहे असे समजून उद्धव ठाकरे कारभार करत होते व हुकूमशाही आणि कारभार करत होते त्यांनाही

चांगली चपराक आहे. नेतृत्व वारसा हक्काने मिळाले तर ते सक्सेस होत नाही त्याला कर्तुत्वच लागते. उद्धव ठाकरे हे शरद पवार व सोनिया गांधी यांचे गुलाम झाले असून आता त्यांनी कायम त्यांची गुलामगिरी करावी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब

ठाकरे यांची हिंदुत्ववादाची शिवसेना एकनाथ शिंदे चालविण्यात समर्थ आहे. जो शरद पवार व सोनिया गांधीचा गुलाम झाला त्याच्या खांद्यावर भगवा शोभत नाही, अशी टीका महेश चिवटे यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *