
करमाळा प्रतिनिधी
मी किल्ला विभागातील रहिवासी असून माझे निवासस्थान नगर पालिका कार्यालय ते श्री शनिमारूती मंदिर किल्ला वेस या मार्गावर आहे. सदरच्या मार्गावर तीन ते चार मोकाट कुत्रे असून रस्त्यावरून येणा-याजाणा-या विद्यार्थ्याच्या, नागरिकांच्या

मागे लागत आहेत. यामध्ये दोन दिवसापूर्वी समर्थ सागर गायकवाड या विद्यार्थ्याचा पाठलाग या कुत्र्यांनी केला होता. त्यात त्यास जबर दुखापत ही झालेली होती. याबाबत त्याच्या पालकांनी आपल्याकडे लेखी /तोंडी तकार केली होती. परंतु अद्याप आपण कोणतीही कार्यवाही केलेली नाही .

आज दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी माझा मुलगा शंभू नेहमीप्रमाणे शाळेत चालला असता त्याचाही पाठलाग या मोकाट कुत्र्यांनी केला. तो घाबरून पळत जाताना समोरून येत असलेल्या सायकलला धडकता धडकता सुदैवाने वाचला. अशा घटना रोज घडत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे. याबाबत आपणास विनंती की सदर कुत्रे जीवे न मारता योग्य ती ‘

कार्यवाही करावी आणि सदरच्याकुत्र्यांचा योग्य तो तातडीने बंदोबस्त करावा ही नम्र विनंती. यापुढे असे प्रकार होताना जर कोणाला काही दुखापत झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. असे पत्र सामाजिक कार्यकर्ते यांनी मुख्याधिकारी करमाळा नगर परिषद यांना दिले आहे.

