
करमाळा प्रतिनिधी
आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात करमाळा तालुक्यातील शेलगाव (वां) येथील उपलब्ध जागेत केळी संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात मागणी केली होती. तसेच पत्रव्यवहार करुन त्याचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी शासनाने सकारात्मक कार्यवाही करण्याविषयी आश्वस्त केले होते. आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे प्रयत्नांना यश आले असुन उद्या दि.१०/०१/२०२४ रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात मिटींग आयोजित केली असल्याची माहिती आ.मोहिते पाटील यांनी दिली आहे.

सोलापुर जिल्ह्यात केळी लागवडीखालीत क्षेत्रात प्रचंड वाढ झालेली असुन सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आलेले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातुन निर्यात झालेल्या केळीमध्ये ५०% वाटा एकट्या सोलापुर जिल्ह्याचा राहीला आहे. त्या दष्टीने केळी उत्पादनाला अधिक वाव देण्यासासाठी केळी पिकांच्या योग्य व्यवस्थापनासाठी या ठिकानी संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे गरजेचे असल्याचे आ.मोहिते पाटील यांनी राज्य शासनाच्या निदर्शनास आणले होते.

महाराष्ट्रात केळी पिकावर संशोधन करणारे केळी संशोधन केंद्र, जळगाव आणि नांदेड येथे कार्यरत आहे. या केंद्रांच्या माध्यमातुन केळी उत्पादक शेतक-यांना अनेक संशोधनपर महत्वाच्या शिफारशी देऊन एकूण विक्रमी केळी उत्पादनात मोलाचा वाटा उचललेला आहे.
त्या दृष्टीने या भागातील हवामान, मृदापरीक्षण, केळीच्या जाती, लागवडीचे तंत्रज्ञान, अन्नद्रव्यांची मात्रा, केळी पिंकावरील रोग व किंडींचे व्यवस्थापन, शिक्षण आणि प्रशिक्षण यादृष्टीने अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी शेलगाव ता.करमाळा येथील कृषी विभाग महाराष्ट्र शासन फळरोपवाटिका व महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत कोरडवाहु संशोधन केंद्राच्या

एकुण सुमारे १०० एकर जागेपैकी उपलब्ध जागेवर केळी संशोधन केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्याच्या दृष्टीने संबधित विभागांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहीती आ.मोहिते पाटील यांनी दिली आहे.
आ.मोहिते पाटील केळी संशोधन केंद्रासाठी प्रचंड आग्रही असल्याने त्यांच्या पाठपुराव्यास यश येत असुन लवकरच करमाळा तालुक्यात शेलगावं (वां) येथे केळी संशोधन केंद्र स्थापन होईल असा विश्वास केळी उत्पादक शेतकर्यांतुन व्यक्त होत आहे.
