
करमाळा प्रतिनिधी
पंढरपूर येथे ओबीसी महा एल्गार मेळावा सहा जानेवारी दिवशी होणार आहे. या मेळाव्याच्या जनजागृतीसाठी ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष अखिल भारतीय समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा येथे

आढावा बैठक झाली. सहा जानेवारी पंढरपूर येथे होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी करमाळा तालुक्यातून दोनशे ते अडीचशे गाड्या जाणार आहेत. या बैठकीला सोलापूर जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष आबासाहेब खारे, करमाळा समता

परिषदेचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय अडसूळ, पंचायत समिती माजी सदस्य रोहिदास सातव, समता परिषदेचे

तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव बनकर, करमाळा तालुका समता परिषदेचे युवा अध्यक्ष सुभाषराव जाधव, पांडे गावचे सरपंच गोरखा अनारसे, सोमनाथ शिरसागर, अजित दुधे, प्रवीण होगले, अंकुश हंडाळ, सुभाष अभंग, नाना अनारसे, प्रवीण गायकवाड, अण्णा शिंदे, रासकर, आदि जन पदाधिकारी उपस्थित होते.


