करमाळा प्रतिनिधी 

      प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवलाल स्वामी महाराज यांच्या जन्म शताब्दी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने कंदर ता. करमाळा येथे  २५ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तर विशेष उपस्थिती पालकमंत्री व उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील असणार आहेत. 

     तसेच या सोहळ्यास विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री क्षेत्र इंचगिरी कर्नाटकचे मठाधिपती रेवणसिद्धेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचे वंशज कान्होबा महाराज देहूकर, आजरेकर फड पंढरपूरचे प्रमुख भागवत महाराज चवरे, माणकोजी बोधले संस्थांचे अँड. जयवंत बोधले महाराज, वासकर फडप्रमुख राणा महाराज वासकर, अ.भा. भाट संघटनेचे अध्यक्ष सुनील मलके व जगदीश दादा महाराज कोल्हापूरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

     प्रमुख उपस्थिती सह राज्यातील अनेक आजी व माजी आमदार, खासदार तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी व माजी पदाधिकारी जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

      या कार्यक्रमावेळी सकाळी ८ दुग्धभिषेक, दुपारी १२ श्रीगुरु पूजन, दुपारी २ दिंडी प्रदक्षिणा, सायंकाळी सन्मान कार्यक्रम असे कार्यक्रमा असणार आहेत.

  तरी या सोहळ्यास तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरचे सर्व साधक, भक्तगण यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *