
करमाळा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी २५१५ व १२३८ या लेखा शिर्षाखालील योजनांतर्गत विवीध विकास कामांना मंजूरी मिळण्यासाठी भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी वेळोवेळी निवेदना द्वारे व

प्रत्यक्ष भेट घेवून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे निधी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे करमाळा तालुक्यातील केम येथे हनुमान मंदीरा समोर सभा मंडपा साठी १० लाख रुपये व काळभैरवनाथ मंदीरा

समोरील सभामंडपा साठी १० लाख रुपये, आवाटी येथिल येडेश्वरी मंदीरा समोरील सभामंडपासाठी १० लाख रु., कंदर मध्ये आण्णासाहेब पवार घर ते संजय थोरे घर रस्ता सुधारणे कामी १० लाख रु., भालेवाडी गाव ते जूने गावठाण रस्ता याकरिता

१० लाख रुपये, चिखलठाण मध्ये दोन वेगवेगळ्या सिमेंट रोड करिता २० लाख रुपये, जिंत -पोमलवाडी डांबरीकरण रस्ता १० लाख रुपये, जिंती ते रेल्वे स्टेशन रस्ता काँक्रिटीकरणासाठी १० लाख रुपये, वांगी नं. ३ व वांगी नं. ४ येथे रस्त्या साठी प्रत्येकी

१० लाख रुपये, तरटगाव येथे सामाजिक सभागृहासाठी १० लाख रुपये, करंजे गावात व्यायाम शाळेसाठी ५ लाख रुपये, झरे गावात आमृळे वस्ती ते बागल वस्ती रस्ता मुरुमीकरण व खडीकरणासाठी ५ लाख रुपये व चौधरी वस्ती रस्ता

काँक्रिटिकरणासाठी १० लाख रू., मोरवड येथे व्यायामशाळेसाठी १० लाख रुपये, बीटरगाव श्री येथिल रस्त्या साठी १० लाख रुपये, मौजे मिरगव्हण येथील स्मशान भुमी साठी ५ लक्ष व रस्ता मुरुमीकरण व खडीकरणा साठी ५ लक्ष रु., आदी गावांसाठी तब्बल दोन कोटी रुपये मंजूरीचा शासन निर्णय दि. १४ डिसेंबर रोजी पारीत झाला आहे.