करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना संततधारचे अनुदान द्या अशी मागणी भाजपचे नितीन झिंजाडे यांनी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेकडे केली आहे. याबाबत अधिक बोलताना झिंजाडे म्हणाले की, भारत डाळ वाटप

योजनेच्या शुभारंभ आज भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज करमाळा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उदघाटणप्रसंगी खासदार निंबाळकर हे आज करमाळा येथे आले होते. गत वर्षी संततधार

पावसाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. राज्य सरकारने संततधार पाऊस नुकसान भरपाई साठी ग्राह्य धरला आहे. त्यानुसार राज्यतील शेतकऱ्यांना मदत निधी वितरित झाला आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आजपावेतो मिळाला नाही. यानुसार खासदार निंबाळकर यांनी यांनी लागलीच माढा विभाग प्रांत आधिकारी प्रियंका आंबेकर यांना सूचना दिल्या आहेत. यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना संततधार मदत लवकर मिळणार आहे असे झिंजाडे यांनी शेवटी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *