करमाळा प्रतिनिधी

30 जुलै रोजी झालेल्या ऑनलाईन अरिस्तो किड्स अंतर्गत घेण्यात आलेल्या अबॅकस व वैदिक मॅथस Online   परिक्षा. २५ देशातून व इतर सर्व राज्यातून चार हजार तीनशे विद्यार्थ्यांमधून घेण्यात आली.

या स्पर्धेसाठी करमाळा येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्चांक मिळवणारी नावाजलेली मुथा अबॅकस अकॅडमी मधून ७४ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग परीक्षेसाठी नोंदवला होता व त्यामधून 59 विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ 10 सप्टेंबर रोजी यश कल्याणी सेवाभावी सदन येथे प्रमुख विश्वस्त पाहुण्यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशजी करे पाटील, मार्गदर्शन साठी प्राध्यापक व्याख्या त्या सविता दूधभाते पंढरपूर व प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापक डॉक्टर विद्या दुरदे, मुख्याध्यापक चारूशिला जाधव, प्राध्यापक मिलिंद फंड, प्राध्यापक उत्तम विटूकडे, प्राध्यापक अनिस बागवान, प्राध्यापक अवचर सर या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

यावेळी स्वयंसंस्कार संस्थेचे संस्थापक प्राध्यापक उत्तम विटूकडे सरांना आदर्श शिक्षक म्हणून मानपत्र देऊन यश कल्याणी सेवाभावी सदन कडून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शिका प्राध्यापिका सविता दुधभाते यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना, विद्यार्थी व पालक यांनी सकारात्मक सुसंवाद साधला पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात बौद्धिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा भावनिक बुद्ध्यांक समतोल पातळीवर विकसित होण्यासाठी, पालकांनी मुलांना सकारात्मक विचार प्रक्रिया, यश अपयशाला समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता, मूल्य, संस्काराची रुजवणूक यावरही पूरक संवाद साधून विद्यार्थ्यांना बौद्धिक, शारीरिक मानसिक पातळीवर विकासात्मक व सकारात्मक समतोल साधण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

गणेश करे पाटील सरांनी अबॅकस या तंत्राने विद्यार्थ्यांमध्ये किती बदल घडतात व विद्यार्थी किती वेगवान बनतो त्या माध्यमातून विद्यार्थी गणितीय क्रिया काही सेकंदामध्ये करतो व हे सर्व करत असताना त्याचा आत्मविश्वासही जास्तीत जास्त पद्धतीने वाढत असतो.

जसे अन्न, वस्त्र, निवारा काळाची गरज आहे अगदी त्याच पद्धतीने जर आपल्याला स्पर्धात्मक युगामध्ये राहावयाचे असेल तर अबॅकस व वैदिक मॅथस चे प्रशिक्षण घेणे प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेचे आहे‌. सर्व पाहुण्यांनी आपले मनोगत समर्पक शब्दात व्यक्त केले. विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या शिंदे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन अवचर सर यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती मुथा यांनी केले.

यशाचे मानकरी आदित्य कापसे, सार्थक वनारसे, हर्ष शहा, हर्षवर्धन ओहळ, ओम खाडे, विश्वजीत कामटे, सृष्टी कामटे, सई पडवळे, आर्यन झिंजाडे, समर्थ शिंदे, मनस्वी पोतदार, शरयू फरतडे, आर्यन कापसे, श्रावणी गवळी, कृष्णा देशमुख, प्रगती देशमुख, धूर्वि खटके, स्पंदन घरबुडे, ओजस गांधी, स्वराज जाधव, महेक नहार, जानवी लोकरे आर्या फंड, आर्यन रोकडे, स्वप्निल कुदळे, खुशी शहा, अभिराज माने, निरज सागडे, सादिया बागवान, आदिल शेख, जोया शेख, आदित्य सोनी, हर्षल सोळंकी, साई काळे, जयदेव भिंगारे, श्रेयस पवार, रिधम बोराडे, तनिश तळेकर,यश शहा,अथर्व शहा, जईद शेख,समीक्षा थोरे,काव्या शेलार, श्रीशा गोयकर, हिबा कबीर, संग्राम लावंड,.अरजान बागवान.

या सर्व विद्यार्थ्यांना यश कल्याणी संस्थेकडून सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या ट्रॉफी व सुवर्णपदकाची ही वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रचंड पालकांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. प्राध्यापक उत्तम तुकडे सर यांनीही पालकांना मौलिक मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका प्राध्यापिका ज्योती मुथा यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *