
भाजपा संपर्क कार्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले की, काश्मीर खोऱ्यापासून ते रामेश्वरम पर्यंत सर्व देशात अहिल्याबाईंनी मंदिरे बांधली, अनेकांचे जिर्णोध्दार केले, धर्मशाळा बांधल्या, नद्यांच्या काठी अगणित घाट बांधले, अनेक ठिकाणी गरीबांच्या

साठी अन्नछत्रे उभारली, लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शेकडो विहिरी बारवांची निर्मिती अहिल्याबाई होळकर यांनी केली. अशा प्रकारे अहिल्याबाई होळकर केवळ कारूण्यमुर्ती बनून राहिल्या.

राजमाता अहिल्याबाईंचे दातृत्व कर्णासारखे अलौकिक होते. पण अशा दानधर्मासाठी त्यांनी राज्याची संपत्ती वापरली नव्हती तर आपल्या खाजगी संपत्तीतून दानधर्म केला होता. आपल्या असामान्य दातृत्वामुळे आणि धर्मनिष्ठेमुळे ह्या माऊलीने

प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आणि ते आजही कायम आहे. पुण्यश्लोक, देवी, साध्वी अशा विविध बिरूदावल्या त्यांना बहाल केल्या गेल्या. माणकोजी शिंदे पाटलांची लेक हि सुन झाली मराठा साम्राज्याचे सुभेदार मल्हारराव होळकरांची. पुढे राणी म्हणूनी शोभल्या मराठा साम्राज्याच्या इंदौर माळवा संस्थानच्या.

अश्या पुण्यवान माऊली पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने विन्रम अभिवादन.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, बाळासाहेब कुंभार, संजय आण्णा घोरपडे, श्याम सिंधी, बाळासाहेब होसिंग, धर्मराज नाळे, दादासाहेब देवकर,दासाबापु बरडे, अमोल पवार, नितीन झिझाडे, विष्णू रणदिवे, मच्छिंद्र हाके, सोमनाथ घाडगे,आजिनाथ सुरवसे, विनोद महानवर, जयंत काळे पाटील,हर्षद गाडे, किरण शिंदे,आबा वीर, कैलास पवार, समाधान काळे, संदीप काळे, लक्ष्मण काळे, किरण बागल, प्रकाश ननवरे, विशाल घाडगे, मनोज मुसळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.