गरीब, मजूर, कामगार,शेतकरी त्यांना मदत करावी

करमाळा प्रतिनिधी,

वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने अकलूज प्रांत कार्यालयात महाराष्ट्रात उष्णतेची लाट उसळली आहे. उष्माघात होऊन शेतकरी कामगार मजूर मोल मजुरी कुटुंब उदरनिर्वाह करीत आहेत. अशातच कुटुंबातील कर्ता उष्माघात होऊन मृत्यू होत आहे. सरकारने मयत कुटुंबातील परिवार सरकारी मदत 20 लाख रुपये देऊन गरीब, मजूर, कामगार,शेतकरी  त्यांना मदत

करावी. अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने मागणी करण्यात येत आहे. मागणी येत्या दहा दिवसांत पूर्ण न केल्यास उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालय येथे उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी शिंदे,फडणवीस सरकारला  की शेतकरी कामगार मजूर यांचा अंत पाहू नये तुम्हाला रस्त्याने फिरू

देणार नाही. ईशारा दिला की  या प्रकरणी लक्ष केंद्रित करावे प्रांत अधिकारी च्या वतीने. यू. आर. देसाई यांनी निवेदन स्वीकारले यावेळी अधिकारी म्हणाले की सरकारकडे मागणी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष गोपाळ (काका)घार्गे,देशमुख, माळीनगर चे सरपंच कोषाध्यक्ष, अभिमान जगताप,

युवा महा सचिव नितीन सरवदे, तालुकाध्यक्ष युवा अध्यक्ष दर्शन सुरवसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमर माने देशमुख, राजाभाऊ देशमुख, विनायक देशपांडे, प्रदीप सरवदे, अरुण भोसले युवा ता.उपाध्यक्ष,पप्पू भोसले, प्रशांत लोखंडे वंचित बहुजन युवा आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *