आदिनाथ च्या पत्रावर मकाई च्या एमडी चा शिक्का मारल्याचे गैरप्रकार

सत्ताधार्यांकडुन रडीचा डाव?

करमाळा प्रतिनिधीः

 मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुक छाननीत सत्ताधार्यांनी हरकती बरोबर जोडलेले विरोधकांचे सर्वच येणे बाकी

दाखले बोगस असल्याचे आढळून आले आहे. दाखल्यावर आदिनाथ ऐवजी मकाई च्या कार्यकारी संचालकांचे शिक्का मारलेले दाखले सत्ताधारी गटाकडुन हरकती बरोबर जोडले आहेत. आशा बोगस दाखल्यावर सुनावणी  झाली आहे. यावर निवडणुक आयोग,सहकारमंत्री,साखर आयुक्त,प्रादेशिक साखर संचालक,निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कडे  तक्रार  दाखल करुन आंदोलन करणार असल्याचे विरोधकांच्या गोठातुन कळत आहे.तसेच बोगस कागदपत्रे तयार करून निवडणूक निर्णय

अधिकाऱ्यांची दिशाभूल केली म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी गटाकडून होणार आहे. यावर आता काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आदिनाथ च्या अकाऊंट विभागाने दाखले देताना शेअर्स व्यतिरिक्त इतर देणे अस लिहून दिले आहे. वास्तविक अस कोणतेही इतर देणे सभासदाकडे नसताना त्याचा दाखल्यावर उल्लेख का केला हे स्पष्ट होत नाही.अनावश्यक शब्द रचना करून

सत्ताधार्यांना मदत करण्याची भूमिका आदिनाथ च्या कार्यालयाने घेतल्याचे दिसते किंवा आदिनाथ ची कोरी लेटर पॅड सत्ताधार्यांच्या बंगल्यावर आणून बोगस दाखले तयार  केल्याचे उघड होत आहे.

वास्तविक सत्ताधार्यांनी निधड्या छातीने निवडणूकिस सामोरे जाण्याऐवजी रडीचा डाव खेळत दाखले अपूर्ण शेअर्स ,किरकोळ चूक दाखवत आक्षेप घेणे बरोबर नसल्याचे सभासदांतुन बोलले जात आहे.

आदिनाथ चे वाढीव शेअर्स ची रक्कम मागणी नोटीस कधीही सभासदांना दिलेली नाही,तसेच  शेअर्स ची रक्कम वाढवण्यासाठी आवश्यक असणारी साखर आयुक्तांची परवानगी देखील आदिनाथ कारखान्याकडे नसताना वाढीव रकमेसाठी हरकत कशी काय घेतली जावु शकते असे कायदेशीर मुद्दे उपस्थित होत आहेत.

कुठलीही कायदेशीर मान्यता नसलेल्या शेअर्सच्या वाढीव रकमेच्या आक्षेपानंतर बरेच जण आदिनाथ वर पैसे भरण्यासाठी गेले असता तिथं पैसे भरून घेतले नाहीत, मुद्दामहून अधिकारी वर्ग फोन बंद करून निघून गेले त्यामुळे सभासदमधून आदिनाथच्या प्रशासना विरुध्द ही चीड व्यक्त होत होती,आदिनाथ चे कर्मचारी सत्ताधाऱ्यांचे घरगडी आसल्यासारखं  वागत असल्याचे दिसून आले.

सत्ताधार्यांनी कारखाना उत्तम प्रकारे चालवून शेतकरी कामगार वाहतूक दार यांचे पेमेंट वेळेत दिले असतेतर आज त्यांच्या वर ही वेळ आली नसती.एकतर सत्ताधार्यांनी स्वतः निवडणुकीतुन पळ काढला आहे व आता पडद्यामागून अर्ज बाद करायचे खेळ ते करत असल्याने सभासद जास्तच नाराज असल्याचे आजच्या छाननी दरम्यान तहसीलदार कचेरी आवारात दिसून येत होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *