
केत्तुर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधि
धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त केतुर येथे प्रथमता सकाळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून सायंकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. दि. १५/५/ २०२३ रोजी भव्य निकाली कुस्त्याच्या आखाडा भरवणेत आला. केतुरचे माजी सरपंच उदयसिंह मोरे-पाटील व उपस्थित मान्यवर यांचे हस्ते या कुस्ती आखाड्या चे उद्धाटन करणेत आले. प्रथम कुस्तीचा

विजेता समाधान पाटील (उप -महाराष्ट्र केसरी) हे ठरले, द्वितीय कुस्ती मध्ये सुहास गोडगे (महाराष्ट्र चॅम्पियन) विजेता ठरला असून तृतीय कुस्ती मध्ये शिवशंभु कुस्ती संकुल कंदरचा सतपाल सोनटक्के विजेता ठरला. हे कुस्ती मैदानावर यशस्वी रित्या पार पाडल्या बदद्ल संयोजक समितीच्या वतीने उदय-खाटमोडे पाटील यांनी सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशितील कुस्ती शौकिनांचे आभार मानले.



