नगरपालिकेच्या दुर्लक्षतेत दुषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील श्री कृष्णाजीनगर, कमलादेवी रोड येथील भागामध्ये काळेकुट्ट पाणी नळाला येत आहे. पाण्याची दुर्गंधी येत आहे. सदरच्या पानीमध्ये गटारीचे गाळ, कारखान्याची काजळी किंवा अन्य काही प्रकार असू शकतात. याची शहनिशा

नगरपालिकाने अद्याप केलीली नसून नगरपालिका सि.ओ. ने स्वतः लक्ष घालून या भागाला स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था करावी. दुषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या भागातील गटारी फुटलेले आहेत, गटारी स्वच्छ

नाहीत तरी नगरपालीकाने ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी. अन्यथा या भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिक आंदोलन करतील याची दखल नगरपालिका अधिकारी यांनी घ्यावी अशी मागणी या भागातील ज्येष्ठ नागरिक गोरखनाथ जाधव, मुकुंद साळुंखे, मोटे, परदेशी, शिगजी, महाडीक, रोडगे, हुळगे, गुगळे, किरवे, भस्मे, नागरीकांनी केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *