
महाडीबिटी अंतर्गत ठिबक सिंचनाचे मिळालेले अत्यल्प अनुदान वाढवून द्या अन्यथा उपोषणाला बसणार : शिवाजी उत्तम सरडे
केम प्रतिनिधी
कविटगाव येथील शेतकरी शिवाजी उत्तम सरडे यांची जमीन गट नं.१३५/२/ब मौजे पांगरे ता. करमाळा हटीत असून एकूण क्षेत्र १.७१ हे. आर आहे. सन २०२२-२३ या वर्ष कालावधीत वरील नमूद क्षेत्रासाठी महाडीबीटी पोर्टल वरती ठिबक सिंचनासाठी अर्ज केला होता. वरील सर्व एकूण १.७१ हे. आर क्षेत्रासाठी ठिबक संचाची खरेदी साठी पूर्व संमती मिळाली होती. ठिबक संच खरेदी करून तो आपल्या शेतीमध्ये अंबरला व नियमानुसार आपले कृषि विभाग कर्मचारी यांनी सरडे यांच्या शेतीत येऊन

पाहणी केली. खरेदी केलेल्या सांधनाची रक्कम २३१५५८ रु. (दोन लाख एकतीस हजार पाचशे अठ्ठावन रुपये) एवढी आहे. एकूण क्षेत्र १.७१ हे. आर आहे. सरडे यांना एकूण ६३८८२ रु. (त्रेसष्ट हजार आठशे ब्याऐंशी रु.) अनुदान मिळाले आहे. परंतु वरील सर्व बिल रक्कम व क्षेत्राचा विचार करता, सरडे यांना मंजूर अनुदान ११५००२ (एक लाख पंधरा हजार दोन रु.) एवढे आहे. तरी देखील सरडे यांना मिळालेली रक्कम हि अत्यल्प आहे. तरी अनुदानाची रक्कम मला का मिळाली ? असा संतप्त सवाल शिवाजी सरडे यांनी केला आहे.

वरील संदर्भानुसार मी या अगोदर तालुका कृषि अधिकारी करमाळा यांना अर्ज केला होता. त्यांना समक्ष भेटलो पण मला कोणतीही माहिती दिली जात नाही. संबंधित कृषिसहाय्यक, कृषी सुपरवायझर व अधिकारी यांचे मनमानी चाललेली आहे. मला काही उत्तर देत नाही. माझे अनुदान रक्कम कुठे गेले? माझे अनुदान रक्कम कशामुळे कमी दिले गेले? याचे उत्तर अद्यापही कृषि अधिकारी सांगत नाही. यावरून असे लक्षात येते की तालुका कृषि अधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार चालत आहे. माझे ठराविक अनुदानच गाय झाले आहे. तरी कृपया मला न्याय मिळावा.

माझी अनुदान कमी झाले बाबत योग्य माहिती मिळावी. अन्यथा मी कृषि आयुक्त साहेब, पुणे यांचे कार्यालयासमोर पुढील महिन्यात उपोषणाला बसणार आहे.