करंजे येथे सरपंच पदी बागल गटाचे काकासाहेब सरडे यांची निवड

करमाळा प्रतिनिधी

मौजे करंजे ता. करमाळा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी बागल गटाचे काकासाहेब रामानंद सरडे यांची पाच विरुद्ध चार अशा मतांनी निवड करण्यात आली. त्याबद्दल मकाई सहकारी साखर कारखान्याचे युवा चेअरमन दिग्विजय  बागल यांच्या शुभहस्ते नूतन सरपंच काकासाहेब सरडे यांचा बागल संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. सरपंच पदी काकासाहेब

सरडे यांच्या निवडीबद्दल राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका आणि बागल गटाच्या नेत्या आदरणीय रश्मी दिदी बागल यांनी मोबाईल वरून सरडे यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच काकासाहेब सरडे यांच्यासह सोनाली पप्पू सरडे, प्रतिभा सुभाष सरडे, अनुराधा राजेंद्र सरडे, सुनिता राजेंद्र जाधव हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी सुनील

बापू सरडे, माजी सरपंच राहुल ठोसर, बाबासाहेब पाटील, अण्णासाहेब गोडगे, सचिन सरडे,  बाळासाहेब वैद्य, विनोद सरडे,  अरुण सरडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. करंजे गावाच्या विकासासाठी आपण सदैव स्वर्गीय मामांच्या विचारातून आपल्या पाठीशी खंबीरपणे राहू असे अभिवचन दिग्विजय बागल यांनी यावेळी दिले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *