
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…
जेआरडी माझा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. 11/4/2023 रोजी सकाळी 10 वा. नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. याचे उद्घाटन डॉ. अविनाश घोलप यांनी केले.

बुधवार दि. 12/4/2023 रोजी सकाळी 10 वा. वकृत्व स्पर्धा आयोजित केली होती. याचे उद्घाटन शेखर गाडे (मा. सभापती पं. स.) व बाळासाहेब क्षिरसागर (मा. नगरसेवक) यांनी केले. वकृत्व स्पर्धेचा विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर होता.
गुरुवार दि. 13/04/2023 रोजी सकाळी 10 वा. निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन अशपाक भाई सय्यद (पत्रकार) व अलीम शेख (पत्रकार) यांनी केले. निबंधेचा विषय सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष होता.

तसेच शुक्रवार दि. 14/4/2023 रोजी सकाळी 10 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला हार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच सायंकाळी 5 वा. भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन दिग्विजय भैया बागल (चेअरमन: मकाई सह. सा. का.) यांनी केले.

त्यावेळी उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती संस्थापक सविता जयकुमार कांबळे, अध्यक्ष जयकुमार भाऊ कांबळे, उपाध्यक्ष फिरोज शेख, खजिनदार सनी कांबळे, युसुफ शेख, मिरवणूक प्रमुख मंगेश ओहोळ व समीर शेख व इतर भिमबांधव उपस्थित होते.
