विर शिवबा काशिद समाधी स्थळाच्या सुशोभिकरणाचा शुभारंभ खासदार कोल्हेंच्या हस्ते

जेआरडी माझा

विर शिवबा काशिद समाधी स्थळाच्या सुशोभिकरणाचा आज पन्हाळगडावर खासदार अमोल कोल्हे यांचे हस्ते शुभारंभ होत आहे.

गोरेगाव (मुंबई) येथे खासदार डाॅ. अमोल कोल्हे व राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या शिष्टमंडळा सोबत झालेल्या बैठकीत वीर शिवबा काशिद समाधीस्थळाची पाऊसामुळे दरवर्षी पडझड होत असते. त्यामुळे समाधी स्थळाच्या सुशोभिकरणाच्या बाबत निधी द्यावा तसेच नाभिक समाजातील विविध महापुरुषांचा इतिहास चित्रपट अथवा मालिकामधुन दाखविला जावा, अशी मागणी उपस्थित बांधवांनी  केली होती.

         या बैठकीतच खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी स्वीय सहायक यांच्याशी चर्चा करून १० लाख रु. निधी वीर शिवबा काशिद यांच्या समाधी स्थळाच्या सुशोभिकरणासाठी माहे ऑगस्टमध्ये जाहिर केला होता.

     याबाबतचे पत्र खासदार कोल्हे यांनी दि.१४/१०/२०२२ रोजी जिल्हा नियोजन अधिकारी, कोल्हापूर यांना दिले आहे. याबद्दल महाराष्ट्रतील समस्त नाभिक समाजातर्फे खासदार कोल्हे यांचे आभार मानले जात आहेत. सदर बैठक प्रसिध्द मेकअप

अर्टीस्ट अमर झेंडे सर यांनी केले होती. या शिष्टमंडळात राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर, सोलापुर जिल्हा युवक अध्यक्ष किरण भांगे, माळशिरस तालुका युवक अध्यक्ष राहुल सराटे, पंढरपुर शहर युवक अध्यक्ष तुकाराम चव्हाण, पंढरपुर शहराचे नेते महेश माने, पंढरपुर दुकान चालक मालक संघटनेचे चेअरमन सोमनाथ खंडागळे इ. उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *