
बौद्धिक स्पर्धेत तब्बल 16 बक्षिसे मिळवून सा. ना. जगताप मुली नं.१ शाळेने केला उच्चांक
जेआरडी माझा
नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या वतीने करमाळा शहरातील सर्व न. प. प्राथ. व खाजगी प्राथमिक शाळांच्या बौद्धिक स्पर्धांचे (निबंध, रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, सामान्यज्ञान परीक्षा) आयोजन करण्यात आले होते.
या बौद्धिक स्पर्धेत नगर परिषदेच्या कै. साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथ. मुलींची शाळा नं.१ शाळेने प्रथम क्रमांकाची 5 बक्षिसे, द्वितीय क्रमांकाची 6 बक्षिसे, तृतीय क्रमांकाची 4 बक्षिसे व उत्तेजनार्थ मध्ये 1 बक्षीस अशी 16 बक्षिसे मिळवून उच्चांक केला.

स्पर्धेतील क्रमांक मिळवलेल्या मुली :-
निबंध स्पर्धा (लहान गट) :- पूर्वा विशाल घोलप (द्वितीय क्रमांक)
निबंध स्पर्धा (मोठा गट) :- लावण्या हौसराव काळे (प्रथम क्रमांक)
समिक्षा महेश थोरे (द्वितीय क्रमांक)
रांगोळी स्पर्धा:- (लहान गट) :- समृद्धी अविनाश साडेकर (उत्तेजनार्थ)
रांगोळी स्पर्धा:- (मोठा गट) :- स्वरा रविंद्र उकिरडे (प्रथम क्रमांक)

मैथिली महेंद्र मांडगे (द्वितीय क्रमांक)
चित्रकला स्पर्धा :- (लहान गट):- उन्नती विशाल परदेशी (द्वितीय क्रमांक), स्वरा महेश क्षिरसागर (तृतीय क्रमांक)
चित्रकला स्पर्धा:-(मोठा गट) :- राणू अमोल आलाट (प्रथम क्रमांक),आलिया आयुब खान (तृतीय क्रमांक)
वक्तृत्व स्पर्धा:- (लहान गट) :- आरोही अक्षय घुमरे (प्रथम क्रमांक), भैरवी मनोज लटके (तृतीय क्रमांक)
वक्तृत्व स्पर्धा:- (मोठा गट) :- श्रेया अतुल करळे (प्रथम क्रमांक),कार्तिकी अंकुश सुरवसे ( द्वितीय क्रमांक)

सामान्यज्ञान परीक्षा स्पर्धा:- (इ.१ ते ४) :- कार्तिकी अंकुश सुरवसे (द्वितीय क्रमांक), समीक्षा महेश थोरे (तृतीय क्रमांक)
स्पर्धेतील क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनींचे मन:पूर्वक अभिनंदन मुख्याधिकारी बालाजी लोंढे साहेब, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे साहेब, मुख्याध्यापक दयानंद चौधरी सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमृत सिंग परदेशी, उपाध्यक्षा भाग्यश्री फंड, सर्व सदस्य, सर्व शिक्षक वृंद यांनी केले व सर्व मुलींना पुढील प्रकाशमान शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
