करमाळा पाण्या वाचून तरमाळा शहराची परिस्थिती – मा. नगरसेवक अल्ताफ तांबोळी

करमाळा प्रतिनिधी

करमाळा पाण्यावाचून  तरमाळा अशी परिस्थिती नगर परिषद अधिकाऱ्यांनी शहराची केली आहे अशी माहिती मा. नगरसेवक अल्ताफ तांबोळी यांनी दिली आहे.

करमाळा शहरात पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. महिला नागरिक हातबल झाले आहेत. 3-3 दिवस पाणी मिळत नाही. नगर परिषद अधिकारी कर्मचारी मात्र मार्च एंड च्या नावाखाली वसुली जोरात करीत आहे. कर वसुली देत नाही. त्यांच्या वर कारवाई करीत आहे. जशी तशी सेवा देत नाही नागरिक तक्रारी घेऊन येत आहे. 3-3 दिवसानी पाणी कधी येते – कधी येत

नाही तरी सुद्धा नगर परिषद अधिकारी महिन्याचे पाणी बिल वसुल करीत आहे. असे नको जेवढे दिवस पाणी येते तेवढेच बिल घ्यावे अशी मागणी होत आहे. तरी नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांनी पाण्याचे नियोजन लवकरात लवकर करावे अन्यथा महिला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागेल असे मा. नगरसेवक अल्ताफ तांबोळी यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *