
इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परीक्षेत उज्ज्वल यश
चिखलठाण प्रतिनिधी
राज्यस्तरीय ITS 2023 या प्रज्ञाशोध परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत इरा च्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश
पुनश्च: जेऊर केंद्रात इरा च्या इयत्ता 2 री व इयत्ता 4 थी चेच विद्यार्थी केंद्रात प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावत अव्वल स्थानी*
शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारी चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घवघवीत यश संपादित केल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे *हार्दिक अभिनंदन
प्रशालेतील ITS परीक्षेत जेऊर केंद्रात *प्रथम तीन विद्यार्थी खालीलप्रमाणे

इयत्ता 2 री
1) श्रेया सोमनाथ गुंड -174/200 जेऊर केंद्रात (प्रथम)
2) आरव गणेश लबडे -168/200 जेऊर केंद्रात (द्वितीय)
3) माही ब्रिजेश बारकुंड-166/200 जेऊर केंद्रात (तृतीय)

इयत्ता 4 थी
1) दुर्वा उदयसिंह पाटील – *244/300 जेऊर केंद्रात (प्रथम)
2) परी बाबुराव लबडे – *242/300 जेऊर केंद्रात (द्वितीय)
3) आरव तुकाराम चोरगे – *240/300 जेऊर केंद्रात (तृतीय)

तसेच ITS परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून , *Result 💯% लागला आहे .
परीक्षेच्या तयारीसाठी परिश्रम घेणाऱ्या अपेक्षा अवसरे व सारिका ननवरे या शिक्षिकांचे व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड, मुख्याध्यापक कसबे सर यांनी अभिनंदन केले.
