करमाळा नगरपरिषदेने शहराला वेठीस धरू नये, ठेकेदारावर कार्यवाही करावी – बानु जमादारमाजी नगरसेविका क. न. प.

करमाळा प्रतिनिधी  

 करमाळा नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे शहर स्वच्छतेचे काम न. पा. ठेकेदाराने दोन दिवसांपासुन बंद केले असुन यामुळे शहरात ठिकठिकाणी घाण साचलेली दिसत आहे. सदर ठेकेदारावर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असुन नगरपालिका बरोबर केलेल्या कराराचा भंग केला असल्यामुळे सदर ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करमाळा नगरपरिषदेची माजी नगरसेविका बानु जमादार यांनी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या कड़े लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

          करमाळा नगरपरिषदेला जमादार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर आरोग्य विभागाचा शहर स्वच्छतेचा ठेका विनीत पांडुरंग देवरे वेस्टेक बायोन्हेन्वर ग्रुप यांना दिला असुन सदर ठेकेदाराने नगरपालिकास नियम अटी शर्ती नुसार करार करून दिलेला त्याप्रमाणे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असुन गेल्यां दोन दिवसांपासुन काम बंद ठेवुन शहराला वेठीस धरले आहे. शहरात विविध ठिकाणी घाण साचल्यामुळे रोगराई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यापुर्वीही सदर ठेकेदाराने पंधरा दिवस काम बंद ठेवले होते परंतु मुख्याधिकारी यांनी सदर ठेकेदारावर कुठलीही कार्यवाही केलेली नाही. शहर स्वच्छ ठेवणे ही अत्यावश्यक बाब असुन सदर ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करमाळा नगरपरिषदेची माजी नगरसेविका बानु जमादार यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *