
आठ दिवसात पाच रुग्णांना साडेतीन लाखाची मदत, करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची कामगिरी
करमाळा प्रतिनिधी
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून गेल्या आठ दिवसात करमाळा तालुक्यातील ५ रुग्णांना एकूण ३५०००० रुपयांची आर्थिक मदत संबंधित रुग्ण उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलच्या खात्यावर जमा झाली असून या योजनेचा तालुक्यातील जनतेला मोठा उपयोग झाल्यामुळे रुग्णांकडून समाधान व्यक्त होत आहे.
करमाळा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रोहित वायबासे, वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक दीपक पाटणे, सहसमन्वयक शिवकुमार चिवटे, रुग्ण सहाय्यक नागेश शेंडगे या कार्यकर्त्यांनी संबंधित रुग्णांचे कागदपत्र घेऊन विहित नमुन्यात अर्ज मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षात जमा करून ही निधी मिळून देण्यास प्रमुख भूमिका बजावली.

भुजंग कृष्णाजी गीते राहणार वंजारवाडी यांना गुडघ्याच्या ऑपरेशन साठी ५०००० रुपये मदत झाली आहे, सुमित्रा पोपट खराडे राहणार मोहल्ला गल्ली करमाळा या मुलीला १००००० रुपयाची मदत झाली, मंगल अप्पाराव घुले यांना ५०००० रुपयांची मदत झाली आहे, नारायण गुरुदेव इंगळे कंदर तर यशोदा बाळासाहेब जाधव राहणार वीट यांना १००००० रुपयाची मदत झाली आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष याचे करमाळा स्वतंत्र ऑफिस असून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यरत आहे. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णाला सविस्तर माहिती देऊन संबंधित रुग्णाचा अर्ज भरून घेऊन हा अर्ज ऑनलाइनने मुख्यमंत्री कार्यालयात दाखल केला जातो व याचा संपूर्ण पाठपुरावा करून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्यकर्ते संबंधित रुग्णाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात ज्या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची मदत हवी असेल त्यांनी करमाळा येथे संपर्क साधावा असे आव्हान रोहित वायबासे यांनी केले आहे.

*****
महेश चिवटे
शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर
***
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा या कार्यालयातून परिपूर्ण प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात दाखल केला जातो येणाऱ्या रुग्णाला संपूर्णपणे सखोल माहिती दिली जाते व संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करून संबंधित रुग्ण उपचार घेत असलेल्या हॉस्पिटल वरच्या खात्यावर रक्कम पोच करेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केला जातो. गेल्या ६ महिन्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा या कार्यालयातून जवळपास ४०००००० रुपयांची आर्थिक मदत गरजू रुग्णांना मिळून देण्यात आली आहे. रुग्णांना त्यांच्या बिलात सवलत मिळून देण्यासाठी शिवाय चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटल मधील १०% हातामधील जागा रुग्णांना उपलब्ध करून देण्यास आम्ही भूमिका महत्त्वाची पार पाडत आहोत.