
कमलाभवानी साखर कारखान्यावर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह
करमाळा प्रतिनिधी
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सोलापूर यांच्या सूचनेनुसार कमलाभवानी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शनिवारी 4 मार्च रोजी राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते हा सप्ताह 4 मार्च ते 11 मार्च पर्यंत चालणार असल्याचे माहिती डे.जनरल मॅनेजर क्षिरसागर साहेब यांनी दिली.
कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह (दादा) शिंदे ,जनरल मॅनेजर रोकडे साहेब, जनरल मॅनेजर क्षिरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची शपथ घेण्यात आली.

सर्व कामगारांना औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणकोणत्या प्रकारचे धोके आहेत आणि ते आपण कसे टाळू शकतो याबद्दल क्षीरसागर साहेब यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. आपण काम करत असताना कामाच्या ठिकाणी बाहेरील कोणत्याही प्रकारचा ताण तणाव मनात न ठेवता शरीर आणि मन एकत्र ठेवून काम केल्यास आपण मोठे धोके टाळू शकतो असे मत क्षीरसागर साहेब यांनी व्यक्त केले काम करत असताना उत्तम सुसंवाद असल्यास अनेक धोके टळू शकतील असे त्यांनी सांगितले आपल्या आरोग्याची हानी म्हणजे राष्ट्राची हानी आहे त्यामुळे कोणताही अपघात हा वैयक्तिक नसून आपल्या राष्ट्राच्या मालमत्तेची हानी आहे आपल्या कुटुंबाची हानी आहे आणि आपण ज्या ठिकाणी काम करतो किंवा आपला जिथे अपघात झाला त्या समोरच्याही कुटुंबाची हानी आहे. आपल्या चुकीमुळे दुसऱ्याचे होणारे नुकसान ही टाळू शकतो असे त्यांनी सांगितले आपले तन मन म्हणून एकत्र असणे गरजेचे आहे म्हणजे दोन अपघात टाळणे शक्य आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. कारखान्यामध्ये काम करत असताना आपल्या निष्काळजीपणामुळे अनेक धोके झालेले आहेत त्यामुळे आपण

सर्वकाळ सतर्क राहून काम करावे असा सल्लाही त्यांनी सर्व कामगारांना दिला. कारखान्यामध्ये काम करत असताना कोणीही मोबाईलचा वापर करू नये. त्यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे ते म्हणाले आपला एखादा अवयव निकामी झाल्यास त्याची आर्थिक भरपाई आपण करू शकतो परंतु आपल्या शरीराची भरपाई करु शकत नाही म्हणून सर्वांनी तन मनाने काम करा असा सल्ला त्यांनी दिला.
कारखान्याचे सुरक्षा अधिकारी ज्ञानेश्वर धनके यांनी सर्वांना सुरक्षिततेची शपथ दिली त्यानंतर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.