
रवींद्र धंगेकरांच्या रूपाने काॅग्रेसची विजयाची घोडदौड अशीच राज्य भर चालु राहील : प्रतापराव जगताप
जेआरडी माझा
आजवरचा काॅग्रेस पक्षाचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळी काॅग्रेसला संमपवण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळी क्रांती ही पुण्याच्या मध्यवर्ती भागातुन घडली आहे, मग अगदी लोकमान्य टिळकांन पासुनची उदाहरणे आहेत , जे मध्यवर्ती पुण्यात

होते तेच हळु हळु संपुर्ण महाराष्ट्रात झाले आहे आणि पुढेही गतिमानतेने सुरू राहील , असा विश्वास करमाळा काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना जगताप म्हणाले की, धंगेकरांचा विजय हा सामान्य जनता , बेरोजगार युवक-युवती व्यापारी यांनी दिलेला जातीयवादी शक्ती आणि महागाई च्या विरोधातला कौल आहे .
