करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील सध्या पुणे व पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असणाऱ्या मंडळींनी आपली एक करमाळा तालुका मित्रपरिवार मंडळ पुणे व पिंपरी चिंचवड या नावाने संघटना उभारली आहे. या संघटनेची त्रिमासिक संवाद बैठक संपन्न झाली व विविध मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली.

प्रास्ताविक मनोजकुमार मारकड यांनी केले, 2013 पासूनच प्रवास सांगितला, मूळचे करमाळा तालुक्यातील सध्या पुणे व पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असणाऱ्या मंडळींची ही सर्वात जुनी व शिस्तबद्ध संघटना आहे. संघटनेकडे जवळजवळ 1400 कुटुंब जोडले गेलेले आहेत, मोफत सहप्रवासी उपक्रम, इतर सर्व कार्यात सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची सातत्याने होत असणारी मदत सहकार्य मार्गदर्शन याचा गौरवाने उल्लेख केला, पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात शासकीय अधिकारी व इतर व्यावसायिकांकडून सदस्यांना वेळोवेळी होत असलेल्या मदतीविषयी माहिती दिली, संघटनेच्या वतीने माजी आमदार संजयमामा शिंदे, नेत्या रश्मी दीदी बागल, आमदार नारायण पाटील, उद्योजक बाळासाहेब कांबळे, अशा अनेक दिग्गजांच्या या संघटनेला बिगर राजकीय बैठका झाल्या आहेत. सर्वांनी या संघटनेचे कौतुक केले आहे असे मनोज मारकड यांनी सांगितले, आतापर्यंत झालेल्या बैठकांसाठी ज्यांनी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली त्यांचा नामोल्लेख करून आठवण करून दिली व आभार व्यक्त केले. भविष्यातील काही उपक्रमासंदर्भात सर्वांमते ज्या गोष्टी ठरतील त्यासाठी मुख्य संघटक म्हणून त्यांनी सकारात्मक होकार कळविला व आजच्या बैठकीचा उद्देश सांगून प्रास्तविक संपवले.

बैठक सुरुवात करताना ज्येष्ठ सदस्य नंदकुमार तळेकर सरांची विद्यार्थी समिती संचालक पदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार तळेकर यांचे अभिनंदन केले. ज्येष्ठ सदस्य पोलीस अधिकारी धर्मराज आवटे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकानंतर अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. प्रामुख्याने रेल्वे डिपार्टमेंटला विविध निवेदने देण्यासंदर्भात पुणे व पिंपरी चिंचवड येथून जेऊरला जाणाऱ्या गाड्यांना चिंचवड येथे स्टॉप देण्यासंदर्भात निवेदन देण्याचे ठरले, एक मत झाले, अनेक महत्त्वाच्या रेल्वेना जेऊर येथे थांबा मिळावा यासाठी ही संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे,  पुणे व पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असणाऱ्या करमाळा कर मंडळींसाठी इतर उपक्रमा संदर्भात ही सर्व सदस्यांनी लवकरच कार्यक्रम घेण्याचे ठरविले. पूर्वी झालेल्या उपक्रमा संदर्भात अभिनंदन व कौतुक केले.

संघटनेचे संघटक उद्योजक संतोष दादा कांबळे यांनीही व्हिडिओ कॉल वरती सर्व सभासदांची हितगुज केली संवाद साधला. या बैठकीसाठी जागा व सर्वांना चहाची सोय केल्याबद्दल ऍक्टिव्ह सभासद गोविंद जगदाळे सरांचे सर्वांनी कौतुक अभिनंदन केले व आभार मानले. उपस्थित सर्व सभासदांनी विविध विषयावर आपले विचार मांडले व लवकरच पुढील त्रिमसिक बैठक बनवण्यासंदर्भातील माहिती ग्रुप वर पाठवण्यात येईल. उपस्थित सर्व सभासदांचे करमाळा तालुका मित्रपरिवार मंडळ पुणे व पिंपरी चिंचवड च्या वतीने कौतुक करण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *