करमाळा प्रतिनिधी

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात क्रीडा शिक्षक बाळासाहेब ढवळे सर तसेच योग प्रशिक्षक डॉ. ओंकार पाटील सर, संस्था अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी मॅडम यांच्या उपस्थितीत मल्लखांब या पारंपरिक क्रीडा प्रकाराची सुरुवात करण्यात आली. 

योगासनाचे शारीरिक,मानसिक आणि आध्यात्मिक फायदे जाणून घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाला गती देण्यासाठी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल रोशेवाडी येथे तीन दिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ.ओंकार चक्रधर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते सध्या बेंगलोर येथे बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स चे शिक्षण पूर्ण करत आहेत. योग गुरूंनी विद्यार्थ्यांना कपालभाती, अर्धचक्रसन, सूर्यनमस्कार, शशांकासन असे विविध प्रकार शिकवले.

संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी सर यांच्या हस्ते क्रीडा शिक्षक बाळासाहेब ढवळे सर, योग प्रशिक्षक डॉ. ओंकार पाटील सर, मल्लखांब प्रशिक्षक गोरक्ष लोंढे सर, मल्लखांब प्रात्यक्षिक सादर करणारे समाधान क्षीरसागर आणि रणवीर चेंडगे यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग व पारंपरिक क्रीडा प्रकारांविषयी उत्साह निर्माण झाला असून शाळेत मल्लखांबाचा नियमित सराव सुरू होणार आहे.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका दळवी यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम व योगसाधनेचे महत्व समजावून सांगितले. हे योग शिबिर उत्साहात पार पडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

यावेळी सहशिक्षिका शिवांगी कांबळे, शुभांगी खळदकर, रोहिणी गरड, सुनंदा दुधे, अश्विनी पाटील, सविता पवार, अश्विनी झाडबुके, कृष्णा पवार, संजय शिंदे, युवराज कानगुडे, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *