करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी जागा मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले आणि एका महिन्याच्या आत जागा उपलब्ध करूण देण्याचे आश्वासन नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत यांनी दिले. धनगर समाजाच्या कायम पाटीशी सावंत गट उभा राहिला आहे आणि पुढिल काळात ही सर्वच

जाती धर्माच्या लोंकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस तयार आहोत अशी भुमिका सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनी बोलताना मांडली. यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष अतुल फंड यांनी ही अहिल्यादेवी स्मारक करमाळा शहरामध्ये झाले पाहिजे आणि त्यासाठी मी व आमचे सर्व नगरसेवक कटिबद्ध आहोत अशी ठोस भुमिका मांडली व येणाऱ्या मिटींग मध्ये

स्मारकाचा विषय मांडण्यात येईल व तो एक मताने मंजूर करण्यात येईल असे अश्वासन उपस्थित सकल धनगर बांधवाना देण्यात आले. यावेळी निवेदन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सकल धनगर समाजातील पुरूष बांधव उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *